आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो.
नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी
पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील
अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल. हा मुख्य दिवाळीचा पहिला
दिवस.

अभ्यंग स्नान विधी:

ह्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करायचे.स्नानाच्या
वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात.त्यावेळी खालील मंत्र
म्हणावा. 



'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।'

अभ्यंगस्नानानंतर नवीन वस्त्रे परिधान करायची.
त्यानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण करण्यास सांगितले आहे. हा तर्पणाचा
विधी पंचांगात दिलेला असतो. त्याप्रमाणे विधी करावा. त्यानंतर आई मुलांना
ओवाळते. काही जण अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून
कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस
(रक्त) जिभेला लावतात.

या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून,
दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा.
त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी.

त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा. देवदर्शन घ्यायचे

'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।'

 सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा
दिवस. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी
समजूत आहे.दुपारी ब्राह्मणभोजन घालतात आणि वस्त्रदान करतात. प्रदोषकाळी
दीपदान करतात. ज्याने प्रदोषव्रत घेतले असेल, तो प्रदोषपूजा आणि शिवपूजा
करतो. संध्याकाळी घर, दुकान, कार्यालय आदी प्रज्वलित दिव्यांनी अलंकृत
करावी

नरक चतुर्दशीची पौराणिक कथा :
 
पूर्वी प्राग्ज्योतिषपूर येथे भौमासुर किंवा नरकासुर या नावाचा एक बलाढ्य
असुर राज्य करत होता. देव आणि मानव यांना तो फार पीडा देऊ लागला. हा
दुष्ट दैत्य स्त्रियांना पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा
सहस्र उपवर राजकन्यांना कारागृहात कोंडून ठेवले आणि त्यांच्याशी विवाह
करण्याचा बेत केला. 
 
त्यामुळे जिकडेतिकडे हाहाःकार उडाला. श्रीकृष्णाला हे
वृत्त समजताच सत्यभामेसह त्याने नरकासुरावर आक्रमण केले आणि त्याला ठार
करून सर्व राजकन्यांना मुक्त केले. मरतांना नरकासुराने कृष्णाकडे वर
मागितला, ‘आजच्या तिथीला जो मंगलस्नान करील, त्याला नरकाची पीडा होऊ
नये.’ कृष्णाने तसा वर त्याला दिला. त्यामुळे आश्विन वद्य चतुर्दशी ही
‘नरक चतुर्दशी’ मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी
अभ्यंगस्नान करू लागले. चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या
रक्ताचा टिळा कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन
दिले. स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला. 
 
श्रीकृष्णानी अत्याचारीनरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची
मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाश आणि मुक्ताचा आनंद हे या
दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.या दिवशी पहाटेच पणत्या लावतात.
सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या
दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top