माझ्या मोबाइलवर तुझी रिंगटोन ऐकली..की
मी धावत पळत येतो...
तुझा फोन आला ह्या नादात
तुझा फोन रिसीव करायला  विसरुन जातो.....

फोन उचलल्या वर तुझ ते "हॅलो" एकुन
माझ्या काना मध्ये मध घोळतो..
आणि त्या नादात
तुला "हॅलो" बोलायचं विसरुन जातो..

फोनेवर बोलताना मधेच तुझे गोड हसणे...
बालिशपणा त्यात उसळत असतो..
त्यात मी वाहुन जातो.
मला काय बोलायचं हेच मी विसरुन जातो..

तुझ्याशी बोलताना मनात एक उमेद येते..
दु:खी असलेले माझे मन ही मग,
तुझ्या बरोबर हसायला लागते
काही क्षण का होईना,
माझ दु:ख सुद्धा मी विसरुन जातो..

माझ्या अशा विसरण्याने..
तुझे ते लटके रागावणे..:
अस्स नाही हा करायचे हा
असे तुझे ते लाडिक बोलणे..
आणि मग रागावुन तुझं फोन ठेवण्..

तुझ्या अशा वागण्याने मी पार विरून जातो..
आणि तु फोन ठेवला तरी..
मी मात्र फोन ठेवायचा विसरुन जातो..

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top