.लालबागचा राजा २०११ (संपूर्ण दर्शन)
 गणेशोत्सव तोंडावर आला की भक्तांना ओढ लागते ती लालबागच्या राजाची! त्याचे प्रसन्न रूप तनामनात साठवण्याची... त्याचा आशीर्वाद घेऊन सुखदुःखाला खंबीरपणे सामोरे जाण्याची...

किती लोभस रूप आहे ...गणेशाचे! सुरेख!!

लालबागचा राजा’ हे शब्द नुसते उच्चारले तरी अनेकांचे हात नकळत जोडले जातात


खूप सुंदर बोलके डोळे
सुंदर अलंकाराने सजलेला 


अलंकाराने बाप्पाचे सौंदर्य आणखीनच वाढते


भक्ताच्या श्रद्धेचा पाया श्री मूर्तीच्या पाद्यपूजेवर आधारलेला आहे. आधी पाय तयार केला जातो आणि तो करताना असंख्य भक्तगण उपास करतात. पायाची पूजा झाल्यानंतर पायाची माती मूर्तीच्या मातीत एकजीव करण्यात येते. आपण सर्व जन या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होवुया

बाप्पाचा आणि आपला लाडका उंदीरमामा चांदीमध्ये घडवलेला आहे सोनेरी काठ असलेलं भरजरी सोवळं व शेला नेसवल्यानंतर एकेक साज चढवला जातो. बाजूबंद, कंठहार, कमरपट्टा, मुकुट अशी आभूषणे परिधान केल्यानंतर राजाचं हे रूप भविकांच्या नजरेत भरून उरतं.’

बोला ...गणपती बाप्पा मोरया ....मंगलमुर्ती मोरया !!!

Post a Comment Blogger

 
Top