आटपाट नगर होते
राजा राणी सुखाने नांदत होते, प्रजाही आनंदात होती.
नगरीत तशी कुणाचीच काहीच तक्रार नव्हती
इथवर सर्व काही सुरळीत चालू होते,
पण एके दिवशी राज्यात त्या रहायला आल्या,
अन नगरीचे वासेच फिरले...
नगरीच्या ऐन वस्तीत
त्या दोन कमनीय नर्तक सुकन्या राहत होत्या
मुन्नी आणि शीला स्वतः ला म्हणवून घेत होत्या

सारी प्रजा काम सोडून लाळ घोटत
त्यांच्या मागोमाग फिरत होती..
मुन्नीला बदनाम म्हंणत होती, अन
शीलाच्या जवानीची तारीफ करत होती...
लवकरच ही बातमी राजापर्यंत गेली
त्याने (as usual) सेनापतीची बोलावणी केली..
होता बसलेला चिंतेत राजा...सेनापती आला,
"काय झाले महाराज", हसत हसत म्हणाला
महाराज म्हणाले
"आम्ही जरा काय गेलो लढाया दूर देशा
कसली ही केली तुम्ही राज्याची दुर्दशा..?
जो तो गातोय मुन्नी-शीलाची गाणी,
कोण ऐकेल आता आमच्या यशाची कहाणी..?
अहो सेनापती, डोक्यावरून पाणी गेलंय पार
मुनी-शीलाला आता करावयास हवे हद्दपार.."
सेनापती गालातल्या गालात हसला..अन म्हणाला
"महाराज, मलाही होती हीच काळजी
अन मी योजलाही होता उपाय यावर
मग नंतर कळले की राज्यातून स्वतःहूनच
कमी होईल त्यांचा वावर..."
महाराज म्हणाले, "अरे वा, शाब्बास सेनापती,
मला ठाऊक होते, एकटी तुमच्याकडेच आहे मती"
"पण मला आता उत्सुकता लागली आहे अशी
सांगा ही ब्याद स्वतःहून जाईलच कशी.."
सेनापती म्हणाला,
"महाराज, बातमी पक्की आहे की मुन्नी-शीला
लवकरच आपले बस्तान गुंडाळणार आहे,
कालच पेपरात वाचलेय मी, की
दिपीकाचे नवे आयटेम सोंग येणार आहे..." :-)
















आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top