एवढ मोठ आकाश जेव्हा छोट वाटत,
समुद्रातील पाणी सार हातात मावत,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.श्वास घेण्यासाठी तो थांबून राहतो,
ती येणार नसेल तरीही तिचीच वाट पाहतो,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
 
शब्दांनी सांगायचे ते डोळ्यांनी सांगतो,
डोळ्यांनी पहायचे मनाने पाहतो,
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.


थंडीत जेव्हा पाऊस पडतो,
अन उन्हाळ्यात आपण कुडकुडतो,
असं जेव्हा वाटू लागत.
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
 
केव्हा समजावं प्रेम झालय,
असा जेव्हा प्रश्न पडेल, मन पाखरा सारख उडेल,
तेव्हाच समजावं कि खर प्रेम झालय.


साभार - कवी: विशाल गावडे.

Post a Comment Blogger

 
Top