... आणि विसर्जनाचा दिवस येऊन ठेपला. शेवटच्या दिवशी मंडपातलं वातावरण एकदम पालटलेलं. मूतीर् दुपारी दोनपर्यंत विसर्जनासाठी बाहेर पडली पायज

े, असा सज्जड दम सदामामाने पोरांना दिलेला. त्यामुळे टंगळमंगळ बंद. गेली ११ दिवस पोरं एक दिलानं श्रींच्या सेवेसाठी झटत होती. घरच्या अडचणी, वैयक्तिक व्यथा, आजारपण, चिंता... या सर्वार्ंचा काही दिवसांपुरता विसर पडलेला. हेवेदावे, रुसवेफुगवे, शाब्दिक चकमकी, एकमेकांशी धरलेला अबोला, पाहुण्यांचं स्वागत, आरतीची गडबड, दर्शनाची रांग, सांस्कृतिक कार्यक्रम, वर्गणीची वसुली, इतर मंडळांच्या भेटी... असल्या भरगच्च कार्यक्रमाची आज अखेर! बाप्पाला निरोप द्यावा लागणार असल्यानं मंडपातलं वातावरण भावूक झालेलं. बाप्पाला निरोप दिल्यावर गुरुवारपासून आयुष्याचं तेच रूटीन चक्र. बाप्पाच्या सेवेसाठी मालक सुट्टी देत नाही, म्हणून कंत्राटी नोकरीकडे पाठ फिरवणाऱ्या राजाची नोकरीच्या शोधासाठी पायपीट सुरू होणार. मन्या, नाम्या, अव्याची कॉलेजात घोकंपट्टी सुरू होणार. पाटील नेहमीप्रमाणे स्वत:च्या हॉटेलच्या गल्ल्यावर बसणार. गोट्या एका कंपनीत इंटरव्ह्यूसाठी जाणार असतो... मामा उद्यापासून सगळ्यांची बिलं भागवण्याचं काम करणार असतो... गणेशोत्सवानं १२ दिवस या सर्वांना बांधून ठेवलं. त्यांच्यातला कार्यकर्ता जागा केला. त्यांना सामाजिक भान दिलं. त्यामुळे बाप्पाला निरोप देणं या कार्यर्कत्यांसाठी जड झालेलं...

शेवटच्या आरतीला सुरुवात होते. मंडळातील झाडून सगळे कार्यकतेर्, बिल्डींगमधले रहिवासी आरतीत सहभागी झालेले. आरती संपते. 'गणपत्ती बाप्पा मोरया...'चा गजर होतो आणि मूतीर् बाहेर काढण्याची तयारी सुरू होते. मूतीर् ट्रॉलीवर चढवण्यात रघू, राजा, सतीश आणि अव्या तरबेज. बाहेर ट्रक उभा. डिजेवालाही तयार. संजा त्याला भिडलेला. टुकार गाणी वाजवलीच तर पेमेंट होणार नाही, असा दमच त्याला दिलेला. बरोब्बर सव्वादोन वाजता मिरवणुकीला सुरुवात होते. सत्यनारायणाच्या पुजेचा मान मिळवण्यावरून एकमेकांशी खुन्नस धरलेला रवी आणि संजा राग विसरून एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चालत असतात. मन्या आणि नाम्याचा कोंबडी डान्स रंगात आलेला असतो. मामा गुलालानं पार माखलेला. पोरं रस्त्यावर येऊन ट्रॅफिक जॅम होणार नाही, याची जबाबदारी अव्या, सतीश आणि राजाकडे. वाजतगाजत मिरवणूक चौपाटीवर येते.

आरती होते आणि पोरांचा नूर पालटतो. भंकस एकदम बंद. सगळ्यांचं असं एकत्र येणं आता थेट पुढल्या वषीर्. विसर्जनासाठी पोरं समुदात शिरतात. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. डोळ्यांतून वाहणारं खारं पाणी समुदाच्या खाऱ्या पाण्यात मिसळून जातं.

दाटलेल्या कंठानं पोरं ओरडत असतात...

गणपती बाप्पा मोरया .........पुढच्या वर्षी लवकर या !!!




 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top