कांदे-पोहे देतानाचे
क्षण बांधिले गाठीला .
कशी-बशी पहिल्यांदी
साडी गुंडाळली काठीला !
.
आईनेही दागिन्यांचे
दालनचं केले खुले ,
मोग-याच्या गज-याला
अबोली ती भुले !
.
आरसा तो लुब्धावला
नजर खाली झुके ,
छातीमधे धड-धड
घसा वेडा सुके !
.
उतरले पसंतीला नि
प्रतिप्रश्न 'तिकडून' आला,
नजरेनेच नजरेतला
होकार तो घेवून गेला !

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top