नवीन नवीन मी पुण्यात,
हॉस्टेल मधे राहायला आले..
बेड जवळ एक खिडकी,
आणि खिडकी समोर एक वाळलेले झाड
त्याकडे पाहून रॉज़ मन होई दुखी,
या दुखी मनाने एकच प्रार्थना केली..
वाळलेल्या झाडाला येऊ दे आज पालवी,
आली हिरवी पालवी आणि लाल फुलांनी सजली..
ते पाहून मन खूप खुश झाल
आणि खुश होऊन त्या वृक्षाला स्पर्श मी केला..
तो प्रेमळ स्पर्श कदाचित त्या वृक्षालही जाणवला,
लाल फुलांचा वर्षाव त्यानी माझ्यावर केला..
दोन दिवसानंतर काही वेगळच घडल,
त्या वृक्षावर कोणी कुर्‍हाडीने वार केल..
फांद्या जाऊन ते फार निस्तेज हतबल झाल,
ते पाहून आज माझ्या डोळ्यात पाणी आल..!

साभार आणि कवियेत्री
रुची

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top