काही वेळेला " खोडी " काढायचं मनात नसतं . पण ग्राहकानं अनाठायी शंका
विचारुन बेजार केलं तर " इरसाल पुणेरीउत्तराची " चपराक बसते .

उदा .
शिट्टीवर सुरेल गाणं सादर करणारा मित्रवर्य अप्पा कुलकर्णी मुळात
महाराष्ट्र बँकेत होता . त्याच्या बँकेसमोरचा रस्ता फक्त ओलांडायचा अवकाश
, समोरच आणखी एक सहकारी बँक होती . तिथलाच " चेक " घेऊन आपल्यामहाराष्ट्र
बँकेतल्या खात्यात भरण्यासाठी ग्राहक महाशय आले . नेमकं काउंटरवरच्या
अप्पाला त्यांनी विचारलं . " कॅश कधी होईल ?"

अप्पा म्हणाला , " उद्या बँकेला सुट्टी आहे , परवा होईल ."

ग्राहाकानं विचारलं , " का पण ? समोरच्या बँकेचा तर चेक आहे . वेळ लागतोच कसा ?"

" अहो . उद्या सुट्टी आहे ...".. अप्पाचा नम्रपणा अद्याप सुटला नव्हता !

" पण समोरच तर बँक आहे ...." ग्राहक हेका सोडेना .

मग खट्याळ अप्पाला राहवेना . तो म्हणाला , " काका , काय आहे , केवळ रस्ता
ओलांडल्यावरच्या बँकेचा चेक आहे म्हणुन लगेचच कॅश होतो असं नसतं .
प्रोसिजर असते ... असं बघा ."

" काही सांगु नका , प्रोसिजर - बिसिजर !"

" ऐका तर काका ... वैकुंठ, स्मशानभुमीच्या दारातच .. समजा तुम्ही गेलात
म्हणजे मेलात तर दारातच गेले म्हणुन सरणावर चढवतील का ? आधी ससुनला नेतील
... चेक करतील .. घरी नेतील .. हार घालतील .. म्रुत्यु पास काढतील .. मग
वैकुंठकडे ..!!"

" कळलं ..!" फणकारत ग्राहक महाशय निघुन गेले। अशा इरसाल प्रश्नोत्तरामुळे
किंवा " न " विचारता केलेल्या - नोंदविलेल्या प्रक्रियेमुळेच पुण्याचा
जिवंतपणा टिकुन आहे ... पूणं कधी ' डल ' होत नाही ..!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top