रागवणार नसशील तर एक गोष्ट सांगू का तुला ?
खरंच तुझी कधी आठवणच येत नाही मला ......

ऐकायचं असेल जर तुला कारण याचं ,
सांगतो आज मी तुला अगदी खरं खरं ....

कोणाची आठवण येण्यासाठी ,
आधी त्या व्यक्तीला विसरावं लागतं

पण तू तर माझ्या ह्रदयात,
रोमारोमात पूर्णपणे भिनलेली आहेस ....
मग सांग मला तुझी आठवण कशी येणार ?

जर तू प्रत्येक क्षणी माझ्या विचारांमध्येच आहेस
जर मी तुला विसरूच शकत नाही....
तर मला तुझी आठवण कशी येणार ?

म्हणूनच तूही कधी म्हणू नकोस ...
की मला तुझी आठवण येते
कारण त्या क्षणी तू मला,
थोडा वेळ का होईना पण विसरून जाशील !

म्हणूनच पुन्हा कधी म्हणू नकोस ...
की मला तुझी आठवण येते !!!!!!!

Post a Comment Blogger

 
Top