काल पुन्हा स्वप्नात आलीस
जीवनात माझ्या येशील का?
डोळ्यांच्या त्या नशिल्या प्याल्यात
स्वतःला हरवु देशील का?

काळ्याभोर् केसांशी खेळ्त
पावसात फिरायला येशील का?
केसात मला चेहरा लपवुन
सुगंधात हरवु देशील का?

इवल्याश्या नाकावर राग घेऊन
वाट पहात थांबशील का?
मी उशीर केला म्हणून
माझ्याच मिठीत रडशील का?

ओठांच्या दोन पाकळ्या उघडुन
माझे तु नाव घेशील का?
"इश्श" म्हणुन चेहरा लपवत
डोळ्यांनी तुझ्या हसशील का?

कवितेमध्ये माझ्या गुंतुन
स्वप्नात नव्या हरवशील का?
एकएक माझे स्वप्न वाचुन
सत्यात ते उतरवशील का?

Post a Comment Blogger

 
Top