कळायला लागल्यापासुन मला वाटायचं
समुद्र किना-यावर बसुन
"तिच्या" खांद्यावर हात टाकुन
शेंगदाणे खाण्यालाच प्रेम म्हणतात

अगदी अलीकडेच मला जाणवलं ,
दिवसभर राबुन,लोकलचे धक्के खात
घरी जाताना बायकोसाठी घेतलेला गजरा
जीवापाड जपुन नेण्याला प्रेम म्हणतात

कितीही जपला तरी चुरगाळतोच गजरा
चुरगाळलेला गजराही तिला खुप हवा असतो
तिच सांगते आपल्याला तो तिच्या केसात माळायला
खरंच तिच्या ह्या सांगण्यालाच प्रेम म्हणतात

Post a Comment Blogger

 
Top